Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 बाबेलातून पळून जा, खास्द्यांच्या देशातून निघून जा; कळपाच्या पुढे चालणार्‍या एडक्यांसारखे व्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “बाबेलच्या मध्यापासून भटका आणि खास्द्यांच्या देशातून निघून जा; जसे कळपाच्या पुढे चालणारा एडका तसे तुम्ही व्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “बाबेलच्या बाहेर पळा; बाबिलोनच्या लोकांच्या भूमीचा त्याग करा, आणि त्या बोकडांसारखे व्हा, जे कळपाचे नेतृत्व करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:8
11 Iomraidhean Croise  

कसलेला शिकारी कुत्रा, बोकड व सैन्याबरोबर असलेला राजा.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; तिच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाह-णार्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.


माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.


तो मंडळीला म्हणाला, “तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल.”


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan