Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 प्रत्येकजण जो कोणी त्यांच्याकडे बाहेर गेला त्यांनी त्यास खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, आम्ही दोषी नाही, कारण परमेश्वर त्यांचे खरे राहण्याचे ठिकाण आहे, परमेश्वर जो त्यांच्या पूर्वजांची आशा त्याच्याविरुध्द त्यांनी पाप केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘आपण दोषी नाही, कारण याहवेह, त्यांचे हिरवेगार कुरण, आणि त्यांच्या पूर्वजांचे आशास्थान, यांच्याविरुद्धच ज्यांनी पाप केले आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:7
28 Iomraidhean Croise  

कारण, हे प्रभू, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.


कारण त्यांनी याकोब वंशाला गिळून टाकले आहे, व त्यांची वस्ती ओसाड केली आहे.


हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस.


जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


रानातील सर्व पशूंनो, वनातील सर्व पशूंनो, या, खाऊन टाकण्यास या.


पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबाला ग्रासून टाकले आहे, त्याला खाऊन टाकले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.


हे इस्राएलाच्या आशाकंदा, संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या, देशातल्या उपर्‍यासारखा, रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास?


हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.


इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असा होता; त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!


त्या दिवसांत व त्या समयी दाविदाला नीतिमत्तेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन, त्या देशात न्याय व नीतिमत्ता चालवील.


त्या दिवसांत यहूदाचा उद्धार होईल व यरुशलेम सुरक्षित वसेल आणि ‘परमेश्वर आमची नीतिमत्ता’ हे नाव तिला देतील.


ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”


अहो सर्व धनुर्धार्‍यांनो, बाबेलच्या सभोवती युद्धास उभे राहा; त्याला बाण मारा, एकही बाण राखून ठेवू नका; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्राएल लोक व यहूदा लोक ह्यांच्यावर बरोबरच जुलूम होत आहे; ज्या सर्वांनी त्यांना बंदिवान करून नेले त्यांनी त्यांना धरून ठेवले; ते त्यांना मोकळे सोडीनात.


त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली; ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली.


तू इस्राएलाच्या पर्वतांविरुद्ध म्हणालास की, ‘ते उद्ध्वस्त झाले आहेत, ते आम्हांला भक्षण करण्यासाठी दिले आहेत,’ हे तुझे सर्व दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे हे तुला कळेल.


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक ह्यांना सांगितले तेही आम्ही ऐकले नाही.


जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले.


त्यांचे मालक त्यांचा वध करतात व आपणांला निर्दोष समजतात; त्यांची विक्री करणारे म्हणतात की, ‘परमेश्वराचा धन्यवाद होवो; मी श्रीमंत झालो आहे;’ त्यांचे स्वत:चे मेंढपाळ त्यांच्यावर काही दया करत नाहीत.


देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan