Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ते सीयोनाची वाट विचारतील, आपली तोंडे इकडल्या रस्त्यांकडे करून म्हणतील, ‘चला, शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाफ करू.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ते सियोनेची वाट विचारतील व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. ते जातील आणि म्हणतील जो कधी मोडला जाणार नाही अशा सर्वकाळच्या कराराने आपण स्वत: परमेश्वराशी जोडले जाऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते सीयोनकडे जाणार्‍या मार्गाची विचारणा करतील आणि त्या दिशेने ते अभिमुख होतील. ते येतील व याहवेहशी, कधीही विस्मृतित न जाणाऱ्या, एका सार्वकालिक कराराशी जडून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:5
26 Iomraidhean Croise  

मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो.


माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे; तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्‍चित आहे; माझा संपूर्ण उद्धार व अभीष्ट ह्यांचा तो उदय होऊ देणार नाही काय?


तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले, मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


ते अधिकाधिक शक्ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते.


तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.


कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.


त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्याबरोबर चालेल, ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील.


वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये.


कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर जागल्ये ओरडून सांगतील, ‘अहो उठा, आपण सीयोनेस आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे जाऊ.”’


आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत.


परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’


तू आपल्या वडील बहिणी व आपल्या धाकट्या बहिणी ह्यांचा अंगीकार करशील तेव्हा तू आपले आचरण स्मरून लज्जित होशील, आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या करारातल्या नसल्या तरी त्या कन्या म्हणून देईन.


मी ह्या देशात, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन; त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील; ती ह्यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत; ह्यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत.


यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.


तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’


आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan