Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 बाबेल घेण्याच्या वेळी झालेल्या आवाजाने पृथ्वी कापत आहे, तिचा आवाज राष्ट्रांमध्ये ऐकू येत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 बाबेल जिंकून घेण्याच्या आवाजाने पृथ्वी हादरेल आणि त्यांच्या दुःखाची आरोळी राष्ट्रांमध्ये ऐकायला येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:46
14 Iomraidhean Croise  

माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”


पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


त्यांच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कापत आहे; आरोळी होत आहे, तिचा आवाज तांबड्या समुद्रात ऐकू येत आहे.


पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे; कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत.


बाबेलात आरोळीचा ध्वनी येत आहे! खास्द्यांच्या देशातून विध्वंसाचा गोंगाट होत आहे!


तुझ्या पतनदिनी द्वीपांचा थरकाप होत आहे! तुझ्या निघून जाण्याने समुद्रातील द्वीपे भयचकित झाली आहेत.’


तुझ्या खलाशांनी मारलेल्या आरोळीच्या आवाजाने तुझ्या आसपासची जमीन हादरत आहे.


गर्तेत जाणार्‍याबरोबर मी त्याला अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांना थरथर कापवले; तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व वृक्ष, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे वृक्ष समाधान पावले.


अनेक राष्ट्रे तुला पाहून भयचकित होतील असे मी करीन; मी आपली तलवार त्यांच्या राजांसमोर परजीन, तेव्हा ते थरथर कापतील; तुझ्या पतनाच्या दिवशी आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan