Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 ह्यास्तव वनपशू रानकुत्र्यांसह तेथे राहतील, शहामृग तेथे राहतील; तेथे कधीही वस्ती होणार नाही; पिढ्यानपिढ्या तेथे कोणी वस्ती करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 यास्तव रानटी पशू कोल्ह्यासहीत तेथे वस्ती करतील आणि तरुण शहामृग तेथे राहतील; कारण सर्व काळी तिच्यात पुन्हा कोणी कधीही रहाणार नाही. पिढ्यानपिढ्या तिच्यात कोणी वस्ती करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 “म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील, व घुबडे येऊन राहतील. येथे आता पुन्हा कधी मानवाची वस्ती होणार नाही; किंवा ही नगरीत पिढ्यान् पिढ्या ओसाड पडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:39
12 Iomraidhean Croise  

तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”


तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.


कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.


तुझ्यातला दगड कोपर्‍यासाठी अथवा पायासाठी कोणी घेणार नाही; तर तू कायमचाच उजाड होशील असे परमेश्वर म्हणतो.


त्याची नगरे ओस पडली आहेत. त्यांतला प्रदेश निर्जल झाला आहे, तेथली भूमी रुक्ष झाली आहे, तेथे मनुष्यवस्ती नाही, व त्यातून कोणी मानवपुत्र येत-जात नाहीत.


तो जोरदार वाणीने म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan