Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 त्याच्या घोड्यांवर, त्याच्या रथांवर व त्यांच्यात राहणार्‍या सर्व मिश्र जातींवर तलवार उपसली आहे, ते स्त्रिया बनतील! त्याच्या निधींवर तलवार उपसली आहे, ते लुटीस जातील!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 त्यांच्या घोड्याविरूद्ध, त्यांच्या रथावर आणि बाबेलाच्यामध्ये जे कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे. ते स्त्रियासारखे असे होतील. तलवार तिच्या भांडारावर आली आहे, आणि ती लुटली जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 तिचे घोडे, रथांवर तलवारीचा प्रहार होईल! आणि तिच्यात राहणाऱ्या विदेशीयांवरही होईल! ते दुर्बल होतील. तिच्या संपत्तीवर तलवारीचा प्रहार होईल! त्यांची लूट केली जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:37
20 Iomraidhean Croise  

तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.


हे याकोबाच्या देवा, तुझ्या धमकीने रथ व घोडा ह्यांना गाढ निद्रा लागली आहे.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे.


सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,


अरबस्तानातले सर्व राजे व रानात वसणार्‍या सर्व मिश्र जातींचे सर्व राजे ह्यांना,


करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.


ते खास्द्यांचा देश लुटतील; त्याला लुटणारे सर्व तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो.


तुम्ही सर्व चोहोकडून त्याच्यावर चढाई करा; त्याची भांडारे उघडा; त्याचे ढीग करा; त्याचा विध्वंस करा; त्याचे काही शिल्लक राहू देऊ नका.


तुझ्या द्वारे मी घोडा व स्वार ह्यांचे तुकडे तुकडे करीन;


तुझ्या द्वारे मी रथ व सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी नरनारींचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी वृद्ध व तरुण ह्यांचे तुकडे तुकडे करीन आणि तुझ्या द्वारे मी तरुण व तरुणी ह्यांचे तुकडे तुकडे करीन;


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


म्हणजे खास्द्यांच्या देशात लोक वध पावून पडतील, त्याच्या आळ्यांतून विंधलेले पडतील.


कूशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाती व कूबी आणि त्यांच्याबरोबर करारमदार केलेल्या देशांचे लोक त्यांच्यासह तलवारीने पडतील.


माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, वीर व सर्व प्रकारचे योद्धे ह्यांना खाऊन तुमची तृप्ती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.


पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.


मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन; रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यांवरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan