Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 वाचाळांवर तलवार उपसली आहे; ते वेडे बनतील, त्याच्या वीरांवर तलवार उपसली आहे; ते फजीत होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 जे कोणी भविष्यासाठी वचन सांगतात त्यांच्याविरुद्ध तलवार आली आहे, याकरिता की, ते आपल्यास मूर्खाप्रमाणे प्रकट करतील. तिच्या सैनिकांविरूद्ध तलवार येत आहे, अशा रीतीने ते दहशतीने भरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल ते सल्लागार मूर्ख बनतील! तिच्या योद्ध्यांवर तलवारीचा प्रहार होईल! ते अत्यंत भयभीत होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:36
22 Iomraidhean Croise  

कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”


अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती.


तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”


परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


परमेश्वर म्हणतो, त्याचा क्रोध, त्याची पोकळ बढाई, मला ठाऊक आहे; ती व्यर्थ ठरली आहे.


पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्‍यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे होईल.”


ह्यामुळे त्यांचे तरुण त्याच्या चवाठ्यावर पडतील, त्याचे सर्व वीर त्या दिवशी स्तब्ध होतील, असे परमेश्वर म्हणतो.


तुझ्या द्वारे मी मेंढपाळ व त्याचा कळप ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे शेतकरी व त्याच्या बैलांची जोडी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; आणि तुझ्या द्वारे मी अधिपतींचे व नायब अधिपतींचे तुकडे तुकडे करीन.


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


नदीचे उतार हस्तगत झाले आहेत, लढवय्ये फजीत झाले आहेत, असे ते सांगत आहेत.


निनवे पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती; तरी आता ते पळून जात आहेत; ते “थांबा हो थांबा,” असे ओरडतात, पण कोणी मागे वळून पाहत नाही.


पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.


आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणार्‍यांना कोठून शोधून आणू?


ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;


तर तो गर्वाने फुगलेला आहे; त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे वेडा बनला आहे; ह्यांपासून1 हेवा, कलह, अपशब्द, दुसर्‍यांविषयीचे दुष्ट संशय उत्पन्न होतात;


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan