Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. तो त्यांच्या पक्षाने लढेलच, म्हणजे मग तो पृथ्वीला विसावा देईल, पण बाबेलच्या रहिवाशांना घाबरे करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील, म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलाच्या रहाणाऱ्यावर संघर्ष आणील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:34
32 Iomraidhean Croise  

तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक; त्यांना न्याय दे; तुझ्या लोकांनी तुझ्याविरुद्ध पाप केले असेल त्यांना क्षमा कर.


मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील;


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्‍यांचा जीव नागवील.


कारण त्यांचा कैवारी समर्थ आहे; तो त्यांचा कैवार घेऊन तुझ्याविरुद्ध होईल.


हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.


परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.


आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.


परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.


जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्का-र्‍यांच्या तावडीतून मुक्त करीन.”


त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील, त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांना मी शासन करीन.


कारण परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून मुक्त केले आहे.


जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की,


तू हजारांवर दया करतोस, बापांच्या अन्यायाचे प्रतिफल त्यांच्यामागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतोस; थोर पराक्रमी देव, सेनाधीश परमेश्वर हे तुझे नाम आहे,


मवाब ओसाड झाला आहे, त्याच्या नगरांवर लोक चढाई करून गेले आहेत, त्याचे निवडक तरुण वध पावण्यास खाली उतरून गेले आहेत, असे राजेश्वर म्हणतो; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर.


जो याकोबाचा वाटा तो त्यांच्यासारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे, इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


ह्यामुळे परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुझ्या पक्षाने लढेन, तुझ्याकरता सूड उगवीन; मी त्याचा सागर आटवीन, त्याचा झरा सुकवीन.


हे प्रभू, तू माझ्या जिवाच्या पक्षाने लढलास; तू माझ्या जिवास उद्धरलेस.


परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करतो; कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे; त्याचा हुकूम बजावणारा बलवान आहे; परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?


हे सीयोनकन्ये, तुला कापरे भरू दे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे; कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलपर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल. तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैर्‍यांच्या हातून सोडवील.


परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.


ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan