Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा मांडला व तू सापडला आहेस, पण तुला कळले नाही; तू सापडलास व तुला पकडलेही, कारण तू परमेश्वराविरुद्ध भांडलास.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा रचला आहे, तू पकडला गेला आहे आणि तुला समजले नाही. तू सापडलास व पकडला गेलास, आतापर्यंत तू परमेश्वराविरुद्ध भांडलास,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि तुला कळण्या आधीच तू त्यात अडकलीस; तू सापडलीस व पकडण्यात आलीस कारण तू याहवेहस विरोध केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:24
17 Iomraidhean Croise  

कारण त्याने देवावर हात उचलला आहे, व सर्वसमर्थाशी उद्दामपणा केला आहे.


“हा बोल लावणारा सर्वसमर्थाशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणार्‍याने आता उत्तर द्यावे.”


देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?


तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे; त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?


मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.


कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.


जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्याला धिक्कार असो! तो मातीच्या खापर्‍यांपैकी एक आहे. ‘तू काय करतोस’ असे माती आपल्या घडणार्‍याला म्हणेल काय? ‘तुला हात नाहीत’ असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय?


हे मवाबनिवासी, भीती, गर्ता व पाश हे तुला प्राप्त झाले आहेत असे परमेश्वर म्हणतो.


जो भीतीपासून निभावेल तो गर्तेत पडेल, जो गर्तेतून बाहेर येईल तो पाशात अडकेल; कारण मी त्याच्यावर म्हणजे मवाबावर समाचार घेण्याचे वर्ष आणत आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती, आणि त्याचे वीर ह्यांना मस्त करीन; ते कायमचे निद्रावश होतील, ते उठायचे नाहीत, असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो.


बाबेल एकाएकी पडून भंगला आहे; त्याबद्दल हायहाय करा; त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा, त्याला गुण येईल.


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan