Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 राष्ट्रांत घोषणा कर व ऐकू येईल असे सांगा! निशाण उंच करा आणि ऐकू येईल असे सांगा. गुप्त ठेवू नका. म्हणा, बाबेल घेतली आहे. बेल लज्जित झाला आहे. मरदोख मोडला आहे. त्यांच्या मूर्तींची फजीती झाली आहे. त्यांचे पुतळे मोडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “राष्ट्रांमध्ये जाहीर कर व घोषणा कर, ध्वज उंचावून घोषणा कर; काहीही मागे सोडू नको, पण म्हण, ‘बाबेलचा पाडाव होणार आहे; तिचे दैवत बेल लज्जित करण्यात येणार आहे, मरोदख भयाने व्याप्त होणार. तिच्या मूर्ती लज्जित करण्यात येणार आहेत तिची दैवते भयाने व्याप्त होणार आहेत.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:2
34 Iomraidhean Croise  

तेव्हा मानवजातीस धाक बसेल; ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील.


राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.


जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो,2 त्याच्या चरणी लागा.


त्या दिवशी तुम्ही म्हणाल : “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा.


उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.


तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”


त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते; म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.


त्या वेळी बलदानाचा पुत्र मरोदख बलदान,1 जो बाबेलचा राजा, त्याने हिज्कीयाला पत्रे व नजराणा ही पाठवली; कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते.


बेल खचला आहे, नबो वाकला आहे; त्यांच्या मूर्ती पाठाळांवर घातल्या आहेत; तुमच्या मिरवणुकीच्या मूर्ती थकलेल्या जनावरांवर ओझ्याप्रमाणे लादल्या आहेत.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो.


तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.”


त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात.


अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका; दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा व म्हणा, ‘ज्याने इस्राएलास विखरले तो त्यांना जमा करील;’ मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करतो तशी तो त्यांची निगा करील.


ती राष्ट्रांना सांगा, पाहा, ती यरुशलेमेस जाहीर करा; “दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत, यहूदाच्या नगरांसमोर ते ललकारत आहेत.


सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश आणत आहे.


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


बाबेल घेण्याच्या वेळी झालेल्या आवाजाने पृथ्वी कापत आहे, तिचा आवाज राष्ट्रांमध्ये ऐकू येत आहे.”


बाबेलच्या कोटांसमोर ध्वज उभारा; पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा; छापा घालण्याची तयारी करा; कारण परमेश्वर बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे.


पृथ्वीवर ध्वज उभारा, राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा, त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा, अराराट, मिन्नी व आष्कनाज ह्या राज्यांना त्याच्यावर चढाई करण्यास बोलवा; त्याच्याविरुद्ध सेनापतींची नेमणूक करा; विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.


बाबेलच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले हे त्याला कळवण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोपे धावत आहेत.


मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन, त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन, राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही; बाबेलचा तटही पडेल.


ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी बाबेलच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन; त्याचा सर्व प्रदेश लज्जित होईल, त्याचे सर्व लोक त्याच्यात ठार होऊन पडतील.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी तिच्या कोरीव मूर्तीचा समाचार घेईन, तिच्या सर्व देशभर घायाळ झालेले कण्हत पडतील.


बाबेल एकाएकी पडून भंगला आहे; त्याबद्दल हायहाय करा; त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा, त्याला गुण येईल.


यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी अवील-मरोदख बाबेलचा राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याचे डोके वर करून त्याला कारागृहातून बाहेर काढले.


ह्याकरता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; जमलेले लोकहो, त्यांचे काय होते ते समजून घ्या.


प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले; त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली; त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली.


नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “अहो शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय?


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


तो जोरदार वाणीने म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan