Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मी इस्राएलास त्याच्या कुरणात परत आणीन, तो कर्मेल व बाशान ह्यांवर चरेल, एफ्राइमाच्या डोंगरावर व गिलादात त्याचा जीव तृप्त होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 “मी इस्राएलाला त्याच्या मातृभूमीत स्थापित करीन. तो कर्मेल व बाशानावर चरेल. नंतर तो एफ्राईम व गिलाद येथील डोंगराळ प्रदेशात तृप्त होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, ते कर्मेल व बाशान येथे चरतील; एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर ते खाऊन तृप्त होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:19
36 Iomraidhean Croise  

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे :


तू माझ्यावरून आपले डोळे काढ; त्यांनी मला घाबरे केले आहे; तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.


देश विलाप करतो; तो म्लान झाला आहे; लबानोन निस्तेज व शुष्क झाला आहे; शारोन अरण्यप्राय झाला आहे; बाशान व कर्मेल आपली पाने गाळत आहेत.


ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.


मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील.


त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्याबरोबर चालेल, ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील.


परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.


परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेर्‍यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील, आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल.


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


आणि मी त्यांच्या याजकांचा जीव मिष्टान्नांनी तृप्त करीन; माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील, असे परमेश्वर म्हणतो.”


कारण श्रांत जिवास मी तृप्त केले आहे, प्रत्येक म्लान हृदयास पुन्हा भरून काढले आहे.”


कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर जागल्ये ओरडून सांगतील, ‘अहो उठा, आपण सीयोनेस आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे जाऊ.”’


पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन.


हे माझ्या सेवका, याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; पाहा, मी तुला दूर देशातून वाचवून आणीन, तुझ्या संततीला बंदिवासातून मुक्त करीन; याकोब परत येईल, निर्भयपणे विश्रांती पावेल, त्याला कोणी धाक घालणार नाही.


माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांना बहकवले आहे; ते पहाडापहाडांतून भटकले आहेत; ते आपले विश्रांतिस्थान विसरले आहेत.


ह्यास्तव असे म्हण : ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला राष्ट्रांतून गोळा करून आणीन; ज्या ज्या देशांत तुम्ही पांगला आहात त्यांतून मी तुम्हांला गोळा करून घेईन, आणि इस्राएल देश तुम्हांला देईन.’


कारण मी तुम्हांला राष्ट्रांतून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हांला स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन.


बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल; शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून वाचेल व ज्या देशात अनेक राष्ट्रांतून जमा केलेले लोक पुनःपुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्राएल पर्वतांवर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील; तथापि त्या लोकांना राष्ट्रांतून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील.


पूर्वेस हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश ह्यांच्या दरम्यान असलेली यार्देन नदी; सरहद्दीपासून पूर्वसमुद्रापर्यंत मोजणी करा; ही पूर्व बाजू झाली.


तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे.


तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.


मी त्यांना मिसर देशातून माघारी आणीन; अश्शूर देशातून त्यांना एकत्र करीन; गिलाद व लबानोन ह्यांच्या भूमीवर त्यांना आणीन; त्यांना जागा पुरायची नाही.


रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.


ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या मंडळीसमक्ष पादाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.”


यहोशवा त्यांना म्हणाला, “तुमची लोकसंख्या वाढली असली व एफ्राइमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हांला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan