Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्याकरता सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी अश्शूराच्या राजाचा समाचार घेतला तसा बाबेलच्या राजाचा व त्याच्या देशाचा समाचार घेईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, जसे मी अश्शूराच्या राजाला शिक्षा केली तसे मी बाबेलाच्या राजाला व देशाला शिक्षा करणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: “मी बाबेलच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन, अश्शूरच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:18
11 Iomraidhean Croise  

ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.


सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.


तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.


अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ झोपी गेले आहेत; तुझे सरदार स्वस्थ पडले आहेत; तुझे लोक डोंगरावर पसरले आहेत; कोणी त्यांना एकत्र करत नाही.


आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणार्‍यांना कोठून शोधून आणू?


तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.


मी आपली चमकणारी तलवार पाजळली, मी न्याय हाती घेतला, तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन, माझ्या वैर्‍यांचे उसने फेडीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan