Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 अहो सर्व धनुर्धार्‍यांनो, बाबेलच्या सभोवती युद्धास उभे राहा; त्याला बाण मारा, एकही बाण राखून ठेवू नका; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुम्ही सर्व बाबेलाविरूद्ध सभोवती मांडणी करून सज्ज व्हा. प्रत्येकजण जो कोणी धनुष्य वाकवतो त्याने तिच्यावर मारा करावा. तुमचा एकही बाण राखून ठेवू नका, कारण तिने परमेश्वराविरूद्ध पाप केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “बाबेलच्या सभोवती तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा, धनुर्धाऱ्यांनो तिच्यावर बाणांचा नेम धरा. तिच्यावर बाण मारा, कोणताही बाण राखून ठेवू नका. कारण तिने याहवेहविरुद्ध पाप केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:14
21 Iomraidhean Croise  

आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएली लढवय्यांपैकी निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले;


तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील.


ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे.


त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांची धनुष्ये सज्ज केली आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारेसारखे, त्यांची चाके वावटळीसारखी आहेत.


अश्वांनो, दौड करा; रथांनो, भरधाव चाला; वीरहो, पुढे चाला; ढालाईत कूश व पूट, धनुर्धारी, धनुष्य वाकवणारे लूदी तुम्ही सर्व चालू लागा.


मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे; राष्ट्रांत जासूद पाठवला आहे; “तुम्ही सर्व एकत्र व्हा, तिच्यावर चढाई करा, युद्धास उभे राहा.”


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य आधार जे एलामाचे धनुष्य ते मी मोडून टाकीन.


माझे वतन लुटणार्‍यांनो, तुम्ही जरी हर्ष व उल्लास करीत आहात, मळणी करणार्‍या कालवडीप्रमाणे बागडत आहात, मजबूत घोड्यांप्रमाणे खिंकाळत आहात,


बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे.


ते धनुष्य व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही; ते सागराप्रमाणे गर्जना करतात, ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे बाबेलकन्ये, ते युद्धास सिद्ध झाल्याप्रमाणे तुझ्यावर येत आहेत.


ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


मी बाबेलवर परदेशीय पाठवीन; ते त्याला उफणतील व त्याचा देश उजाड करतील; कारण ते संकटसमयी त्याला चोहोकडून घेरतील.


पृथ्वीवर ध्वज उभारा, राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा, त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा, अराराट, मिन्नी व आष्कनाज ह्या राज्यांना त्याच्यावर चढाई करण्यास बोलवा; त्याच्याविरुद्ध सेनापतींची नेमणूक करा; विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.


धनुर्धार्‍याने धनुष्य वाकवू नये, चिलखत घालून त्याने उभे राहू नये; त्याच्या तरुणांवर दया करू नका; त्याच्या सर्व सैन्याचा विध्वंस करा;


लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.


तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.


तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्‍याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan