Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 50:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल; तुमची जन्मदात्री लाजेल; पाहा, ते अगदी कनिष्ठ राष्ट्र, वैराण जंगल व शुष्क भूमी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तरी तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल. पाहा, ती राष्ट्रांत क्षुद्र, रान, कोरडी भूमी आणि वाळवंट होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पण तुमची माता अत्यंत लज्जित होईल; जिने तुम्हाला जन्म दिला, तिची अप्रतिष्ठा होईल, ती सर्व राष्ट्रात सर्वात क्षुद्र होईल— मग ती अरण्यात असो, शुष्क भूमीत, वा वाळवंटात असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 50:12
17 Iomraidhean Croise  

“मी त्यांच्यावर उठेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आणि बाबेलचे नाव व अवशेष, त्यांचे पुत्रपौत्र ह्यांचा मी समूळ उच्छेद करीन, असे परमेश्वर म्हणतो.


खास्द्यांचा देश पाहा, तो आता राष्ट्र नाही; त्यांची भूमी अश्शूर्‍यांनी वनचरांसाठी सोडली आहे; त्यांनी मोर्चे लावून तिचे महाल जमीनदोस्त करून ती उद्ध्वस्त केली आहे.


माझे लोक इस्राएल ह्यांना मी दिलेल्या वतनास जे माझे दुष्ट शेजारी हात लावतात त्या सर्वांविरुद्ध परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी त्यांना त्यांच्या देशातून उपटून टाकीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून टाकीन.


सातपुती म्लान झाली आहे; ती प्राण सोडत आहे; भरदिवसा तिचा सूर्य मावळत आहे; ती लज्जित व फजीत होत आहे; त्यांचा अवशेष त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन, असे परमेश्वर म्हणतो.”


कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन.


तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.


परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.


त्याची नगरे ओस पडली आहेत. त्यांतला प्रदेश निर्जल झाला आहे, तेथली भूमी रुक्ष झाली आहे, तेथे मनुष्यवस्ती नाही, व त्यातून कोणी मानवपुत्र येत-जात नाहीत.


ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी बाबेलच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन; त्याचा सर्व प्रदेश लज्जित होईल, त्याचे सर्व लोक त्याच्यात ठार होऊन पडतील.


वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.


तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan