Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 “मी तुला क्षमा कशी करू? तुझ्या पुत्रांनी मला सोडले आहे व जे देव नाहीत त्यांची त्यांनी शपथ वाहिली आहे; मी त्यांना पोटभर चारले तेव्हा त्यांनी जारकर्म केले व वेश्यांच्या घरात गर्दी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:7
39 Iomraidhean Croise  

तुम्ही परमेश्वराचे याजक जे अहरोनाचे वंशज आणि लेवी त्यांना घालवून देऊन इतर राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे आपले याजक केले आहेत, हे खरे ना? एखाद्याने गोर्‍हा व सात एडके आणून स्वतःस संस्कार केला की जे देव नव्हेत त्यांचा तो याजक बनतो.


कारण हा कामाग्नी भस्म करून नाशाप्रत नेतो; त्याच्या पायी माझी सर्व मालमत्ता समूळ नष्ट झाली असती.


तू चोर पाहिलास की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो; तू व्यभिचारी माणसांचा साथीदार आहेस.


ते जर माझ्या लोकांच्या चालीरीती मन लावून शिकतील म्हणजे त्यांनी माझ्या लोकांना ज्याप्रमाणे बआलमूर्तीची शपथ घेण्यास शिकवले त्याप्रमाणे ‘परमेश्वराच्या जीविताची,’ ‘माझ्या नामाची शपथ’ वाहण्यास शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये वसतील.


तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”


तेव्हा तू त्यांना सांग, ‘परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, ते अन्य देवांच्या मागे लागले, त्यांनी त्यांची सेवा व भजन केले, त्यांनी मला सोडले, माझे नियमशास्त्र पाळले नाही.


मानव आपणासाठी देव बनवील काय? असल्या वस्तू तर देव नव्हेतच!”


जे देवच नाहीत असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले काय? तरीपण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला, जिच्यात हित नाही अशा गोष्टीशी केला आहे.


अहो, ह्या पिढीचे लोकहो! तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा; मी इस्राएलास वैराण, निबिड काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? ‘आम्ही मोकाट झालो आहोत, ह्यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही’, असे माझे लोक का म्हणतात?


कारण जारकर्म्यांनी देश व्यापला आहे; शापामुळे भूमी शोक करीत आहे; रानातील कुरणे वाळली आहेत; लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म;


मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रांतील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे असे मला वाटले होते; तुम्ही मला, माझ्या बापा, असे म्हणाल, मला अनुसरायचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटले होते.


आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


अहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते! म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता.


मला वनात वाटसरूंसारखे बिर्‍हाड असते तर किती बरे होते? म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्यांच्यापासून निघून गेलो असतो; कारण ते सर्व व्यभिचारी, बेइमान्यांचा जमाव आहेत.


“आम्ही अपराध केला व फितुरी केली; त्याची तू क्षमा केली नाहीस.


तुझ्या ठायी कोणी आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीबरोबर अघोर कर्म करतो, कोणी आपल्या सुनेबरोबर अगम्यगमन करून तिला भ्रष्ट करतो, कोणी आपल्या बहिणीला, आपल्या बापाच्या कन्येला भ्रष्ट करतो,


हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे.


जसा त्यांना चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले; ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले.


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


ते सर्व जारकर्म करणारे आहेत, भटार्‍याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत, कणीक तिंबवून ती खमिराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळायचा राहतो.


जो दुसर्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे.


जे शोमरोन येथील मूर्तीची शपथ घेऊन म्हणतात की, ‘हे दाना, तुझ्या देवाच्या जीविताची शपथ, बैर-शेब्याच्या यात्रेची शपथ,’ ते पडतील; पुन्हा उठायचे नाहीत.”


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,


आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;”2 आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.”


तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता;


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


देव नाही अशाच्या योगे त्यांनी मला ईर्ष्येस पेटवले, व्यर्थ वस्तूंच्या योगे त्यांनी मला चिडवले; म्हणून ज्यांचे राष्ट्र नव्हे अशांच्या योगे मी त्यांना ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे त्यांना चिडवीन.


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.


तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका; त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला वाहायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका;


Lean sinn:

Sanasan


Sanasan