Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा मी म्हटले, “हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत; परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम त्यांना ठाऊक नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:4
11 Iomraidhean Croise  

त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


ज्याला वाचता येत नाही अशाजवळ तो देऊन म्हणतात, “एवढे वाचून दाखव;” तो म्हणतो, “मला वाचता येत नाही.”


ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप!


“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”


पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता.


आकाशातील करकोची आपला नेमलेला समय जाणते; होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळचे स्मरण ठेवतात; पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाहीत.


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.


‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;


Lean sinn:

Sanasan


Sanasan