Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:3
45 Iomraidhean Croise  

मग दुसर्‍या दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “पाहा, काल रात्री मी बापापाशी निजले, तर आज रात्रीही आपण त्याला द्राक्षारस पाजू आणि तू त्याच्यापाशी जाऊन नीज; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.”


एवढे झाले तरी यराबामाने आपला दुष्ट मार्ग सोडला नाही; त्याने उच्च स्थानांचे याजक सगळ्या लोकांतून नेमले; आपण उच्च स्थानांचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यांना त्याने समर्पित केले.


मग राजाने तिसर्‍यांदा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. ह्या तिसर्‍या पन्नासांच्या नायकाने जाऊन एलीयापुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, “हे देवाच्या माणसा, माझा प्राण व ह्या आपल्या पन्नास दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत.


परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.


पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे.


आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील.


त्याच्याशी जे मित्रत्वाने राहत होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारला; त्याने आपला करार मोडला;1


दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो.


परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत. पण विश्वासघातक्याचे शब्द तो व्यर्थ करतो.


तू म्हणशील, “त्यांनी मला ताडन केले तरी माझे काही दुखले नाही, त्यांनी मला मारले तरी मला काही लागले नाही; मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”


कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.


तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते.


तथापि लोक आपले ताडन करणार्‍यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत.


मी त्यांना आपल्या देशाच्या वेशींवर सुपाने पाखडून टाकले, त्यांना अपत्यहीन केले; मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत.


पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही; ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांना जाऊन सांग की माझी वचने ऐकण्याचा बोध तुम्ही का घेत नाही?”


ते अजून नम्र झाले नाहीत, त्यांना भीती वाटत नाही, व तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी लावून दिलेले आपले नियमशास्त्र व आपले विधी ह्याप्रमाणे ते चालत नाहीत.


पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.


त्यांना असे सांग, ‘आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही ते हेच राष्ट्र आहे; सत्य नष्ट झाले आहे, ते त्यांच्या मुखांतून नाहीसे झाले आहे.


मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळण्यास कबूल होत नाहीत.


हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो’ हे त्यांना सांग.


तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे; मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस; तुझ्यावरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हायची नाहीस.


मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली आहे; तरी आपल्या अधर्मापासून परावृत्त व्हावे व तुझ्या सत्याचा उमज पडावा म्हणून आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याची काकळूत केली नाही;


एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाहीत आणि माझ्याविरुद्ध वागलात,


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


“देवाने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला तसा तुमच्यातल्या काही जणांचा नाश केला आहे; तुम्ही अग्नीतून काढलेल्या कोलितासारखे झालात; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


“मी तर तुम्हांला तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली, व तुमच्या सर्व स्थानांत भाकरीची वाण पाडली, तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


दोन-तीन गावे पाणी पिण्यासाठी एका गावात पडत-झडत गेली, त्यांची तृप्ती झाली नाही; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


“तांबेरा व भेरड ह्यांच्या योगे मी तुमचे ताडन केले; तुमच्या बागा, तुमचे द्राक्षीचे मळे, तुमची अंजिराची झाडे व तुमची जैतून झाडे, कुरतडणार्‍या टोळांनी खाऊन टाकली; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


मी म्हणालो, ‘तिने माझे भय मात्र धरावे, बोध घ्यावा, म्हणजे तिच्यासंबंधाने मी जे काही ठरवले आहे त्यानुसार तिची वस्ती नष्ट होणार नाही.’ पण त्यांनी आपली सर्व दुष्कर्मे नेटाने चालवली.”


पण अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे.


शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan