Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात; आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालांस न्याय देत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 ते पुष्ट झाले आहेत, स्वस्थ मनुष्यासारखे ते चकाकतात. त्यांनी दुष्टपणाची सर्व बंधने पार केली आहेत. ते लोकांच्या आणि अनाथांच्या विनंतींना समर्थन करत नाहीत. त्यांची भरभराट झाली आहे परंतू ते गरीबांचा न्याय न्यायीपणाने करत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत. त्यांच्या दुष्कर्मांना मर्यादाच नाही; ते न्याय करीत नाहीत. अनाथांच्या न्यायाचा पाठपुरावा करीत नाहीत; आणि गरिबांच्या रास्त हक्काचे समर्थन करत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:28
24 Iomraidhean Croise  

लुटारूंचे डेरे समृद्ध असतात, जे देवाला चेतवतात ते निर्भय राहतात, ते आपल्या हातालाच आपला देव समजतात.1


त्यांचे मन कठीण झाले आहे; मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे.


तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्‍यांना चिरडून टाको.


पाहा, दुर्जन ते हेच; हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात.


त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात;


परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीनदोस्त करतो, पण विधवेची मेर कायम राखतो.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस.


परमेश्वर म्हणतो : तुम्ही न्यायनिवाडा करा; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडवा; परका, पोरका व विधवा ह्यांच्यावर अन्याय करू नका; त्यांना उपद्रव देऊ नका; ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडू नका.


परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही,


“शोमरोन डोंगरावर असणार्‍या बाशानाच्या गाईंनो, ज्या तुम्ही दीनांना नाडता, गरिबांना ठेचता व आपल्या धन्यांना म्हणता, ‘आणा, आम्हांला पिऊ द्या!’ त्या तुम्ही हे वचन ऐका :


आणि विधवा, अनाथ, परके व निराश्रित ह्यांच्यावर जुलूम करू नका व आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका.”


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan