Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? माझ्यापुढे थरथर कापणार नाही काय? मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमली आहे; ही सर्वकाळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही; त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही; त्या गर्जना करतात तरी त्यांना ती उल्लंघवत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 परमेश्वर म्हणतो, तुम्ही भीत नाही काय? किंवा माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापत नाही काय? मी सनातन नियमाने समुद्राच्याविरूद्ध वाळूची सीमा घातली आहे, जेणेकरून त्याने उल्लंघन करू नये. जरी समुद्र उठतो आणि खाली पडतो, तरी त्याच्याने उल्लंघवत नाही. जरी त्याच्या लाटा गर्जतात, तरी त्या ओलांडून जात नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” असे याहवेह विचारतात. “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:22
29 Iomraidhean Croise  

मग देव बोलला, “आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो;” आणि तसे झाले.


त्याने तेथे जाऊन पाहिले तेव्हा त्याचे प्रेत वाटेवर पडले आहे आणि त्याच्याजवळ गाढव व सिंह उभे आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले; सिंहाने त्याचे प्रेत खाऊन टाकले नव्हते आणि त्या गाढवास फाडून टाकले नव्हते.


प्रकाश व अंधकार ह्यांमधील हद्दीशी त्याने जलनिधीची सीमा भिडवली आहे.


म्हणून माणसे त्याचे भय धरतात; जे शहाणपणाचा अभिमान वाहतात, त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही.”


समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला?


तू ठरवलेल्या मर्यादेचे त्यांना उल्लंघन करता येत नाही; भूमी झाकायला त्यांना परत येववत नाही.


तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो.


तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो.


सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही. (सेला)


परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.


जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली; जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले;


मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.


अग्नी जसा काड्याकुड्या जाळतो व पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंना आपले नाम प्रकट करण्यासाठी उतरला असतास;


परमेश्वराचे वचन ऐकून कंपायमान होणार्‍यांनो, त्याचे वचन ऐका : “तुमचा द्वेष करणारे तुमचे जे बंधू माझ्या नामाचे निमित्त करून तुम्हांला हाकून देतात व म्हणतात की, ‘परमेश्वराचा गौरव होवो म्हणजे तुमचा हर्ष आम्हांला पाहण्यास मिळेल,’ ते फजीत होतील.


हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.


तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझेच पतन तुला शिक्षा करील; तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर जो तुझा देव त्याला तू सोडले आहेस; आणि तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की,


मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.


“ह्यास्तव, हे इस्राएला, मी तुला असेच करीन; मी तुला असेच करीन, म्हणून हे इस्राएला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध हो.”


तो आकाशात आपल्या मंदिराचे मजले उभारतो, पृथ्वीवर त्याने आपला नभोमंडप स्थापला आहे, तो समुद्राच्या पाण्यास बोलावून ते पृथ्वीच्या पाठीवर ओततो; त्याचे नाम परमेश्वर आहे.


त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला; त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले.


तो समुद्रास दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो; बाशान व कर्मेल त्याच्यापुढे म्लान होतात, लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


तेव्हा त्याने उठून वार्‍याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले.


तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.


परमेश्वर तुझा देव ह्या प्रतापी व भययोग्य नावाचे भय बाळगण्यासाठी ह्या ग्रंथात जी नियमशास्त्राची वचने लिहिलेली आहेत ती तू काळजीपूर्वक पाळली नाहीस,


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan