Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जर तुम्ही म्हणाल की, ‘परमेश्वर आमचा देव त्याने आमचे असे का केले?’ तर तू त्यांना सांग की, ‘तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:19
18 Iomraidhean Croise  

‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.


ह्याकरता जो तुम्हांला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही अशा देशात तुम्हांला ह्या देशातून घालवून देईन; तेथे तुम्ही रात्रंदिवस अन्य देवांची सेवा करीत राहाल; कारण मी तुमच्यावर कृपा करणार नाही.’


मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”


कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.


इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे?


तरी तू म्हणालीस, ‘मी निर्दोष आहे, त्याचा राग माझ्यावरून फिरलाच आहे;’ तू म्हणालीस, ‘मी पाप केले नाही’ म्हणून पाहा, मी तुझ्याशी दावा चालवीन.


“तरी त्या दिवसांतही मी तुमचा पुरा अंत करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.


याकोबघराण्यामध्ये हे पुकारा आणि यहूदामध्ये जाहीर करून म्हणा की,


हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळवील असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला?


परमेश्वर म्हणतो, “मी त्यांच्यापुढे ठेवलेले माझे नियमशास्त्र त्यांनी सोडले, त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत.


दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan