Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, मी दूरुन एक राष्ट्र आणतो, ते शक्तीशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील भाषा तुला माहीत नाहीत. किंवा ते काय बोलतात ते तू समजू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— त्यांची भाषा तू जाणत नाही, त्यांची वाणी तुला समजत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:15
27 Iomraidhean Croise  

तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.”


तो मिसर देशावरून गेला, तेव्हा त्याने योसेफवंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला; ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले; ते असे की,


तोतर्‍यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल;


मी तुझ्याभोवती वेढा घालीन व तुझी नाकेबंदी करून तुझ्यावर मोर्चे रचीन.


मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.


आडदांड लोक, अस्पष्ट बोलणारे बाबर ओठांचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही अशा तोतर्‍या जिभेचे लोक ह्यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत.


मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ही माणसे काय म्हणाली? व आपल्याकडे कोठून आली?” हिज्कीयाने उत्तर केले, “ती दूर देशाहून बाबेलहून माझ्याकडे आली होती.”


तो दूरच्या राष्ट्रांसाठी निशाण उभारतो व शीळ घालून दिगंतापासून त्यांना बोलावतो; पाहा, ते त्वरा करून धावत येत आहेत.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


कारण पाहा, मी उत्तरेकडल्या राष्ट्रांतील सर्व जाती बोलावत आहे, असे परमेश्वर म्हणतो; ते येऊन यरुशलेमेच्या वेशींपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटांपुढे व यहूदाच्या सर्व नगरांपुढे आपापली सिंहासने स्थापतील.


चोराला पकडले म्हणजे तो जसा लाजतो तसे इस्राएलाचे घराणे लज्जित झाले आहे; ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झाले आहेत.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


ती राष्ट्रांना सांगा, पाहा, ती यरुशलेमेस जाहीर करा; “दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत, यहूदाच्या नगरांसमोर ते ललकारत आहेत.


कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर असे म्हणतो की : “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे.


मिसर, यहूदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी ह्या सर्वांना मी शासन करीन; कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.”


तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता?


अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.


ह्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते; त्याला मोठाले लोखंडी दात होते; ते सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी; ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती.


परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “पाहा, हे इस्राएलाच्या घराण्या, मी तुमच्यावर एक राष्ट्र उठवीन; ते हमाथाच्या सीमेपासून अराबाच्या ओहोळापर्यंत तुम्हांला पिडतील.”


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


नियमशास्त्रात लिहिले आहे की, “परभाषा बोलणार्‍या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत,” असे प्रभूम्हणतो.


तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या सार्‍या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan