Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:1
29 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


हे परमेश्वरा, साहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही; मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत.


कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले;


ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.


माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल? अनीती करणार्‍यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील?


दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?


सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.


ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते,


माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून व गल्ल्यांतून करावा; मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही.


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


तर तुम्ही माझ्याशी का वाद घालता? तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा आपल्या स्त्रिया अन्य देवांना धूप जाळतात हे ज्या पुरुषांना ठाऊक होते त्यांनी आणि तेथे उभ्या असलेल्या सर्व स्त्रियांचा मोठा समुदाय व मिसर देशातील पथ्रोसात राहिलेले सर्व लोक ह्यांनी यिर्मयाला प्रत्युत्तर केले की :


मी कान देऊन ऐकले पण ते ठीक बोलत नाहीत; त्यांच्या दुष्टतेचा त्यांना पश्‍चात्ताप होत नाही; ‘मी हे काय केले?’ असे कोणी म्हणत नाही; घोडा रणात धाव घेतो तसे ते सर्व उलटून आपल्या मार्गावर जातात.


मला वनात वाटसरूंसारखे बिर्‍हाड असते तर किती बरे होते? म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्यांच्यापासून निघून गेलो असतो; कारण ते सर्व व्यभिचारी, बेइमान्यांचा जमाव आहेत.


ह्यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी त्यांना गाळून पारखीन; माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार?


मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही.


तेव्हा तो मला म्हणाला, “इस्राएल व यहूदा ह्यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे; देश रक्तपाताने भरला आहे; कारण ते म्हणतात, ‘परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही.’


हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.


ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.


ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडतझडत जातील; ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील तरी त्यांना ते प्राप्त व्हायचे नाही.


तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.


मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan