Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 एलामाचा घात करू पाहणार्‍या त्याच्या शत्रूंपुढे मी त्यांना घाबरे करीन; मी त्यांच्यावर अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन, असे परमेश्वर म्हणतो; मी त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 म्हणून मी एलामाच्या शत्रूसमोर आणि जे त्याचा जीव घेऊ पाहतात त्यांच्यासमोर तुकडे तुकडे करीन. कारण मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन. असे परमेश्वर म्हणत आहे. आणि मी त्यांना संपूर्ण नाश करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 जे एलामचा वध करू इच्छितात, त्या त्यांच्या शत्रूदेखत मी पांगापांग करेन; मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन, माझा भयंकर क्रोधही आणेन,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांचा समूळ नाश करेपर्यंत त्यांचा तलवारीने पाठलाग करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:37
19 Iomraidhean Croise  

परमेश्वर आपले कार्य संपवीपर्यंत व आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संतप्त क्रोध मागे फिरणार नाही; हे पुढील काळात तुम्हांला समजेल.”


मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.


तो कसा भंगला आहे! ते कसे हायहाय करीत आहेत! मवाबाने लाजून कशी आपली पाठ फिरवली आहे! मवाब आपल्या सर्व शेजार्‍यापाजार्‍यांना हास्य व विस्मय ह्यांचा विषय झाला आहे!”


पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्‍यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे होईल.”


दिमिष्क नगरीचा धीर सुटला आहे; ती पळून जाण्यास तयार झाली आहे; दहशतीने तिला पछाडले आहे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश व वेदना तिला लागल्या आहेत.


ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.


मी एलामात आपले सिंहासन मांडीन आणि तेथून राजा व सरदार ह्यांचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो.


प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, तुझ्या आसपास जे कोणी आहेत त्यांच्यातून मी तुझ्यावर दहशत आणतो; तुमच्यातील एकूणएकास हाकून लावतील, भटकणार्‍यांना एकत्र करायला कोणी राहणार नाही.


वाचाळांवर तलवार उपसली आहे; ते वेडे बनतील, त्याच्या वीरांवर तलवार उपसली आहे; ते फजीत होतील.


अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.


ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांना कडू दवणा चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन,


आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन; त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.”


मी त्याच्याभोवतालचे त्याचे सर्व साहाय्यकर्ते व त्याची सर्व सेना ह्यांची दाही दिशांना दाणादाण करीन, व मी तलवार उपसून त्यांचा पिच्छा पुरवीन.


त्यांच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत; तिच्यासभोवती त्यांचा समुदाय आहे; जिवंतांच्या भूमीस ज्यांनी दहशत घातली ते सर्व वध पावले आहेत, तलवारीने पडले आहेत.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


नगराच्या वेढ्याचे दिवस संपले म्हणजे ह्या केसांचा एक तृतीयांश नगराच्या मध्यभागी अग्नीने जाळून टाक; एक तृतीयांश केस घेऊन त्यांवर चोहोकडून तलवार चालव आणि उरलेला एक तृतीयांश वार्‍यावर उडव; ह्या प्रकारे मी तलवार उपसून त्या लोकांची पाठ पुरवीन.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan