Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 एलामावर आकाशाच्या चारही भागांतून मी चार वारे सोडीन व त्यांना त्या चारही दिशांना विखरीन; ज्यात एलामाचे पांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडायचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 कारण मी आकाशाच्या चार कोपऱ्यातून चार वारे आणीन, आणि मी एलामाच्या लोकांस त्या सर्व वाऱ्यांकडे विखरीन. ज्याकडे एलामाचे घालवलेले जाणार नाहीत असे एकही राष्ट्र असणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्‍याला आणेन; ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील; मी त्यांना चारही दिशातील वार्‍यावर पसरवून टाकेन, असे एकही राष्ट्र नसेल जिथे एलामचे निर्वासित नसतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:36
18 Iomraidhean Croise  

परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो; इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो.


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्‍या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


त्यांचे उंट लुटले जातील, त्यांचे बहुत कळप लुटीस जातील. दाढीचे कोपरे छाटलेल्यांची दाही दिशांत मी दाणादाण करीन; व चोहोकडून त्यांच्यावर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो.


तुझ्यामध्ये बाप आपल्या मुलांना खातील व मुले आपल्या बापांना खातील; मी तुझ्या ठायी न्यायशासन करीन व तुझे सगळे उरलेले लोक सर्व दिशांना विखरून टाकीन.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांना त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक येणार नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल.


एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली ह्याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहायचे नाही.


तो बकरा अतिप्रबल झाला; तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्याऐवजी त्याला चार बाजूंना चार ठळक शिंगे फुटली.


“कारण पाहा, धान्य चाळणीने चाळतात आणि एक लहानसा दाणाही जमिनीवर पडत नाही, तसे मी आज्ञा करून इस्राएलाच्या घराण्यास सर्व राष्ट्रांतून चाळून घेईन.


दिव्यदूताने मला उत्तर केले, “हे आकाशातले चार वारे1 आहेत; ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan