Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हे हेशबोना, हायहाय कर! कारण आय उजाड केलेले आहे; राब्बाच्या कन्यांनो, रडा! आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळा, शोक करा, आवारातून इकडून तिकडे धावा; कारण मिलकोम दैवत, त्याचे याजक व सरदार ह्यांच्यासह, बंदिवान होऊन जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे हेशबोना, विलापात आक्रोश कर, कारण आय याचा नाश झाला आहे! राब्बातील कन्यांनो, मोठ्याने ओरडा! तागाची वस्त्रे घाला, आकांत करा आणि तुम्ही व्यर्थ इकडे तिकडे धावाल कारण मिलकोम राजा आपले याजक व अधिकाऱ्याबरोबर एकत्रित बंदिवान होऊन जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:3
28 Iomraidhean Croise  

राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला.


ह्याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सीदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबाचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिलकोम ह्यांच्या भजनी लागले आहेत; ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत आणि शलमोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाहीत.


सीदोन्यांची देवी अष्टोरेथ आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्या नादी शलमोन लागला.


आणि इस्राएलाचा राजा शलमोन ह्याने यरुशलेमेच्या पूर्वेस आणि विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सीदोन्यांची अमंगळ देवी अष्टोरेथ, मवाबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्याप्रीत्यर्थ जी उच्च स्थाने बांधली होती ती राजाने भ्रष्ट केली.


बेथेल व आय ह्यांतले लोक दोनशे तेवीस,


आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.


अगे वेशी, हायहाय कर; अगे नगरी, ओरड; हे पलेशेथा, तू सर्वस्वी वितळून जाशील; कारण उत्तरेकडून धूर येत आहे; त्याच्या सैन्यापैकी कोणी चुकून मागे राहणार नाही.”


बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.


ह्यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील; सर्व लोक शोक करतील, कीर-हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी1 अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल.


सोराविषयीची देववाणी : तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा; त्याचा विध्वंस झाला आहे; तेथे आता घरदार किंवा बंदर राहिले नाही; कित्ती लोकांच्या देशातून त्यांना ही खबर कळली.


तार्शीशास निघून जा; समुद्रतीरीच्या रहिवाशांनो, हायहाय करा.


म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो : “पाहा नो येथला आमोन, फारो, मिसर व त्यांची दैवते आणि राजे, फारो व त्याच्यावर भिस्त ठेवणारे ह्यांचा मी समाचार घेईन.


मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.


मवाब फजीत झाला; हायहाय करा, रडा; मवाब ओसाड झाला आहे, हे आर्णोनात सांगा.


प्रत्येक डोके भादरले आहे; प्रत्येक दाढी मुंडली आहे; सर्वांच्या हातांवर घाव आहेत, कंबरांना गोणपाट आहे.


तुझी कर्मे व तुझे निधी ह्यांच्यावर तुझी भिस्त होती म्हणून तू हस्तगत होशील; कमोश आपले याजक व सरदार ह्यांच्यासह बंदिवान होऊन जाईल.


अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?


बाबेल एकाएकी पडून भंगला आहे; त्याबद्दल हायहाय करा; त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा, त्याला गुण येईल.


माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.


आणि त्यांचा राजा व त्यांच्याबरोबर त्याचे सरदार बंदिवान होऊन जातील,” असे परमेश्वर म्हणतो.


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्यांविषयी रडून आकांत करा.


बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले.


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “भिऊ नकोस, कचरू नकोस; ऊठ, सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगरास जा. पाहा, आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;


तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला; आजपर्यंत तो तसाच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan