Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 त्यांचे सैन्य त्यांचे तंबू व त्यांचे कळप, त्यांच्या तंबूचे पडदे व त्यांचे सर्व साहित्य घेऊन जातील. केदारच्या लोकांकडून त्यांचे उंट आपणासाठी घेऊन जातील आणि त्यांना ओरडून सांगतील. ‘चोहोकडे सर्व दहशत आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्यांचे कळप व त्यांचे तंबू उचलून नेण्यात येतील; त्यांची आश्रयस्थाने, सर्व घरगुती सामान व उंटही हस्तगत केले जातील. लोक त्यांच्यावर ओरडून म्हणतील, ‘प्रत्येक बाजूला आतंक पसरला आहे!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:29
21 Iomraidhean Croise  

मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले.


सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.


हाय हाय! मी मेशेखात मुक्काम करतो, केदाराच्या डेर्‍यांजवळ राहतो.


कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे; पाहावे तिकडे भयच भय! माझ्याविरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली.


त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसवणार नाहीत.


केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.


माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत; माझे पुत्र निघून गेले आहेत; ते नाहीत; माझा डेरा ताणायला कोणी नाही, माझ्या कनाती लावायला कोणी नाही.


नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


दिमिष्क नगरीचा धीर सुटला आहे; ती पळून जाण्यास तयार झाली आहे; दहशतीने तिला पछाडले आहे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश व वेदना तिला लागल्या आहेत.


प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, तुझ्या आसपास जे कोणी आहेत त्यांच्यातून मी तुझ्यावर दहशत आणतो; तुमच्यातील एकूणएकास हाकून लावतील, भटकणार्‍यांना एकत्र करायला कोणी राहणार नाही.


मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे.


कूशानाचे डेरे विपत्तीने घेरलेले मी पाहिले; मिद्यान देशाच्या कनाती थरथरत आहेत.


आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही;


आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो; बाहेर भांडणतंटे, आत भीती.


कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत.


त्या खोर्‍यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्‍यावरील वाळूप्रमाणे अगणित होते.


तेव्हा जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच उठून आमच्यावर प्रहार कर, पुरुषातच पुरुषार्थ असतो.” तेव्हा गिदोनाने उठून जेबह व सलमुन्ना ह्यांना ठार केले आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतल्या चंद्रकोरी काढून घेतल्या.


त्याने मागून घेतलेल्या सोन्याच्या कुंडलांचे वजन सोन्याचे एक हजार सातशे शेकेल भरले. ह्यांखेरीज चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांच्या अंगावरली जांभळी वस्त्रे व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील साखळ्या वेगळ्याच होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan