Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 केदाराविषयी व हासोराची राज्ये, परमेश्वर नबुखद्नेस्सरास हे म्हणत आहे (आता बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर या ठिकणी हल्ला करण्यास जाणार होता) “उठा आणि केदारावर हल्ला करा व पूर्वेच्या त्या लोकांचा नाश करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:28
20 Iomraidhean Croise  

इश्माएलच्या मुलांची नावे त्यांच्या वंशाप्रमाणे ही होत : नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा आणि केदार, अदबील, मिबसाम,


पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले.


त्यांच्या वंशावळी ह्या : इश्माएलाचा ज्येष्ठ पुत्र नबायोथ; त्याच्याखेरीज त्याचे पुत्र हे : केदार, अदबेल, मिबसाम,


सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.


हाय हाय! मी मेशेखात मुक्काम करतो, केदाराच्या डेर्‍यांजवळ राहतो.


यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे.


ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


अरबस्तानाविषयीची देववाणी : ददानीच्या काफल्यांनो, तुम्हांला अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल.


अरण्य व त्यातील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यांत केदार वसत आहे ती, गाण्याचा गजर करोत; सेलाचे रहिवासी उत्सव करोत, ते टेकड्यांच्या माथ्यांवर मोठ्याने जयघोष करोत.


कित्ती लोकाच्या द्वीपात जाऊन पाहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा, व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पाहा.


ददान, तेमा, बूज व केसांची चोंच काढणारे ह्या सर्वांना,


अरबस्तानातले सर्व राजे व रानात वसणार्‍या सर्व मिश्र जातींचे सर्व राजे ह्यांना,


मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे; राष्ट्रांत जासूद पाठवला आहे; “तुम्ही सर्व एकत्र व्हा, तिच्यावर चढाई करा, युद्धास उभे राहा.”


हासोर हे कोल्ह्याचे वसतिस्थान होईल, कायमचे ओसाड होईल; तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.”


अरबस्तान व केदारचे सर्व सरदार व्यापारासंबंधाने तुझ्या मुठीतले असत; कोकरे, एडके व बोकड ह्यांचा ते तुझ्याबरोबर सौदा करत.


मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan