Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 दिमिष्क नगरीचा धीर सुटला आहे; ती पळून जाण्यास तयार झाली आहे; दहशतीने तिला पछाडले आहे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश व वेदना तिला लागल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 दिमिष्क फार दुबळे झाले आहे. ती पळून जाण्यास माघारी फिरली आहे. दहशतीने तिला वेढले आहे. दुःखाने तिला घेरले आहे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेदना होत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 दिमिष्क दुर्बल झाले आहे, पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:24
13 Iomraidhean Croise  

तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”


ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत.


कोणा पुरुषास प्रसववेदना होत आहेत की काय, हे विचारा; पाहा, प्रत्येक पुरुष प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे कंबरेला हात देऊन उभा आहे व प्रत्येकाचे तोंड फिक्के पडले आहे असे माझ्या दृष्टीस का पडत आहे?


वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”


करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.


पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्‍यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे होईल.”


ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.


एलामाचा घात करू पाहणार्‍या त्याच्या शत्रूंपुढे मी त्यांना घाबरे करीन; मी त्यांच्यावर अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन, असे परमेश्वर म्हणतो; मी त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.


त्यांचा लौकिक बाबेलच्या राजाने ऐकला आहे, त्याचे हात गळाले आहेत; प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्याला लागल्या आहेत.


आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.


प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदना त्याला लागतील; तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण तो गर्भाशयाच्या द्वारानजीक योग्य वेळी येत नाही.


पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत.


कारण, ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’. आणि जागोजागी भूमिकंप [व दंगे] होतील व दुष्काळ पडतील; हा तर वेदनांचा प्रारंभ होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan