Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 दिमिष्काविषयीः हमाथ व अर्पद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे. ते नाहीसे झाले आहेत! ते समुद्रासारखे खवळले आहेत, ते शांत होऊ शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 दिमिष्क विषयी: “हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत, कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे. ते निराश झाले आहेत, एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:23
35 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.


अब्राम म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर नि:संतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार.”


म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत.


दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.


दाविदाने सोबा येथील रहिवाशांचा संहार केला तेव्हा रजोन आपल्याजवळ काही लोक जमवून त्यांचा सेनापती झाला; ते दिमिष्क येथे राहिले आणि तेथे त्यांनी राज्य स्थापले.


अश्शूराच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ व सफरवाईम ह्या ठिकाणचे लोक आणून इस्राएल लोकांच्या जागी शोमरोनातील नगरांतून वसवले; शोमरोन ताब्यात घेऊन त्यातील नगरांत ते राहू लागले.


हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?


हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, आणि सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे राजे हे कोठे आहेत?”’


दिमिष्कातल्या नद्या अबाना व परपर ह्या इस्राएलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय?” असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला.


परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दिमिष्कवासी अरामाचा राजा बेन-हदाद ह्याच्याकडे पाठवली; आणि त्याला असे सांगून पाठवले की


तेव्हा अदोमाचे अधिपती हैराण झाले; मवाबाचे नायक थरथरा कापत आहेत; सर्व कनानवासी गलित झाले आहेत.


कालनो कर्कमीशासारखे, हमाथ अर्पादासारखे व शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे;


हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?


हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, सफरवाईम शहर, हेना व इव्वा ह्यांचा राजा हे कोठे आहेत?”’


दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत; त्यांच्याने स्थिर राहवत नाही; त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकतात.


अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.)


खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानात सिद्कियाला गाठले; त्यांनी त्याला पकडून हमाथ प्रांतातले रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्यापुढे आणले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.


तुझ्या कारागिरीचा माल विपुल असल्यामुळे व सर्व प्रकारचा माल तुझ्याजवळ मुबलक असल्यामुळे दिमिष्क तुझ्याबरोबर व्यापार करत असे व तुझ्या मालाबद्दल तो तुला हेल्बोनाचा द्राक्षारस व पांढरी लोकर देई.


पलीकडे कालनेला जाऊन पाहा, व तेथून महान हमाथाला जा, पलिष्ट्यांच्या गथाला जा, ह्या राज्यांपेक्षा ती श्रेष्ठ आहेत काय? त्यांचा मुलूख तुमच्या मुलखापेक्षा मोठा आहे काय?


ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे; तिच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे, तिचे गुडघे लटपटत आहेत, सर्वांच्या कंबरेत कळा निघत आहेत, त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत.


मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला.


मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला; त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली.


त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.


दिमिष्कात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकार्‍याने मला धरण्याकरता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता.


अंमलदारांनी सैनिकांना आणखी म्हणावे की, ‘भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाहीतर त्याच्या सोबत्याच्या हृदयांचेही त्याच्यासारखेच पाणीपाणी होईल.’


माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणीपाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो.


हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan