Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यास्तव परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, अम्मोनाच्या लोकांस राब्बाविरूद्ध जेव्हा मी लढाईसाठी संकेताचा आवाज ऐकावयास लावीन, तेव्हा ते ओसाडीचा ढीग होईल आणि त्यांच्या कन्या अग्नीने जाळल्या जातील. कारण जे कोणी त्याच्या ताब्यात होते त्याचा ताबा इस्राएल घेईल.” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:2
22 Iomraidhean Croise  

राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला.


तुझ्या न्यायकृत्यांमुळे सीयोन डोंगर आनंद पावो; यहूदाच्या कन्या उल्लासोत.


हे ऐकून सीयोन हर्षित झाली; हे परमेश्वरा, तुझ्या न्यायकृत्यांमुळे यहूदाच्या कन्यांनी उल्लास केला.


ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.


माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.


अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?


अम्मोनपुत्रांचा राब्बा ह्याच्यावर तलवार येण्याचा एक रस्ता आणि यहूदात जाऊन तटबंदी केलेल्या यरुशलेमेवर तलवार येण्याचा एक रस्ता आखून काढ.


हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


दक्षिणेतील लोक एसावाच्या पहाडाचा ताबा घेतील; तळवटी तले लोक पलिष्ट्यांवर सत्ता चालवतील; ते एफ्राइमाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र ताब्यात घेतील व बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.


तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल.


ह्याप्रमाणे इस्राएलाने अमोर्‍यांची ही सर्व नगरे घेतली. अमोर्‍यांच्या सर्व नगरांत म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावांत इस्राएल वस्ती करून राहिला.


तू त्या नगरातील सर्व लूट चवाठ्यावर जमा करावीस, आणि ते नगर त्यातल्या लुटीसह आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावेस; त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावास; ते पुन्हा वसवू नयेस.


(रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्‍त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.)


इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे.


तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, “हा डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; बेथ-शान खोर्‍यातील व त्याच्या उपनगरांत आणि इज्रेल खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan