Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 “पाहा, तो सिंहासारखा यार्देनेच्या वनातून वर टिकाऊ कुरणाच्या देशात येईल. कारण मी अदोमाला त्यातून जलद पळून जायला भाग पाडीन आणि जो कोणी मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन. कारण माझ्यासारखा कोण आहे आणि मला कोण हुकूम करीन? कोणता मेंढपाळ मला विरोध करण्यास समर्थ आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:19
28 Iomraidhean Croise  

पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा ह्यांनीच नदीपार जाऊन पूर्व व पश्‍चिम ह्या दोन दिशांकडल्या खोर्‍यांतील लोकांना पळवून लावले.


तो म्हणाला, “हे आमच्या पूर्वजांच्या देवा, परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही.


त्याला चिडवण्याचे धाडस कोणी करणार नाही; तर मग माझ्यासमोर टिकेल असा कोण आहे?


बलवान कोण? असा प्रश्‍न निघाल्यास तो म्हणतो, मी आहे. न्यायाचा प्रश्‍न निघाल्यास तो म्हणतो, मला न्यायसभेपुढे कोण आणील?


मी निर्दोष आहे तरी माझे मला काही कळत नाही; माझा जीव मला नकोसा झाला आहे.


तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही.


तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?


तू स्वर्गातून आपला निर्णय ऐकवला; तेव्हा पृथ्वी भ्याली व स्तब्ध झाली;


कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे?


हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो.


प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाही.


“तू पायी चालणार्‍यांबरोबर धावताना थकलास तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? शांततेच्या देशात तू निर्भय आहेस पण यार्देनेच्या घोर अरण्यात1 तू काय करशील?


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्यासन्निध येईल, कारण माझ्यासन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो.


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


ऐका, मेंढपाळांचा हाहाकाराचा शब्द होत आहे! कारण त्यांचे वैभव लयास गेले आहे; ऐका, तरुण सिंहाची थोर गर्जना होत आहे! कारण यार्देनेचे घोर अरण्य लयास गेले आहे.


मग तो कोरह व त्याचे साथीदार ह्यांना म्हणाला, “परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल; ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल.


कोश वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहचले आणि कोश वाहणार्‍या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसांत यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते);


कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan