Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 “अदोम भयावह होईल; प्रत्येक येणाराजाणारा तिला पाहून विस्मय पावेल, तिच्या सर्व पीडा पाहून तिचा उपहास करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तेथून जाणाऱ्या प्रत्येकाला अदोम दहशत होईल. तशा प्रत्येक व्यक्ती थरथरेल आणि त्याच्या सर्व अरिष्टाविषयी फूत्कार टाकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 एदोम दहशतीचे ठिकाण होईल; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:17
16 Iomraidhean Croise  

आणि हे मंदिर उंच स्थानी राहील तरी त्याच्या जवळून येणारेजाणारे चकित होतील व छीथू करून म्हणतील, परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?


अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील.


परमेश्वर म्हणतो, मी आपल्या जीविताची शपथ वाहिली आहे की बसरा विस्मय, निंदा, उजाडी व शाप ह्यांना पात्र होईल; त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”


परमेश्वराच्या संतापामुळे ते निर्जन होईल, ते अगदी ओसाड होईल; प्रत्येक येणाराजाणारा बाबेलविषयी विस्मित होईल व त्याच्या सर्व क्लेशांस्तव त्याचा उपहास करील.


बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल.


म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी अदोमावर आपला हात उगारीन, त्यांतून मनुष्य व पशू ह्यांचा संहार करीन. तो तेमानापासून पुढे वैराण करीन, ददानापर्यंत लोक तलवारीने पडतील.


राष्ट्रांतले व्यापारी तुझा धिक्कार करतात; तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे; तू कायमची नष्ट झाली आहेस.”’


इस्राएल घराण्याचे वतन उद्ध्वस्त झाले तेव्हा तुला हर्ष वाटला, म्हणून मी तुझेही तसेच करीन; हे सेईर डोंगरा, तू वैराण होशील, एकदम सारा अदोम ओसाड होईल; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.


त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सेईर डोंगरा, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर चालवीन आणि तुला वैराण व उद्ध्वस्त करीन.


मी सेईर डोंगर उद्ध्वस्त व वैराण करीन; त्यात येणार्‍याजाणार्‍यांचा उच्छेद करीन.


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरवलेले रोग पाहतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan