Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तसे मी एसावास उघडेबोडके केले आहे, मी त्याची गुप्तस्थाने उघडी केली आहेत, त्याला लपता येत नाही; त्याचा वंश, त्याचे भाऊबंद व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत, तो गत झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पण एसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघड केली आहेत. म्हणून त्याच्याने आपल्याला लपवता येत नाही. त्याची मुले, भाऊ व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत आणि तो गेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. त्याचे शस्त्रधारी पुरुष, तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:10
13 Iomraidhean Croise  

कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे.


म्हणून मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवीन म्हणजे तुझी लज्जा दिसेल.


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


हे सीयोनकन्ये, तुझ्या दुष्टाईचे शासन आटोपले आहे; तो तुला आणखी पकडून नेणार नाही; हे अदोमकन्ये, तो तुझ्या दुष्टाईचा समाचार घेईल. तो तुझी पातके उघडकीस आणील.


ते कर्मेलाच्या माथ्यावर लपून राहिले, तरी मी त्यांचा सुगावा लावीन व तेथून त्यांना ओढून आणीन; ते समुद्राच्या तळी माझ्या दृष्टिआड लपून राहिले, तरी मी तेथे सर्पाला आज्ञा करीन म्हणजे तो त्यांना डसेल.


एसावाची मालमत्ता कशी धुंडाळून काढण्यात आली आहे! त्याचे गुप्त निधी कसे हुडकण्यात आले आहेत!


अरे तेमाना, तुझे वीर कच खातील, म्हणजे प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पहाडातून सर्व नष्ट होतील.


त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan