Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोकांस मुले नाहीत का? इस्राएलात कोणीही वारीस नाही काय? तर मिलकोमने गाद ताब्यात का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:1
32 Iomraidhean Croise  

धाकटीलाही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.


यार्देनेच्या पूर्व थडीकडील सर्व गिलाद देश आणि गादी, रऊबेनी व मनश्शे ह्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्‍याजवळील अरोएरापासून गिलाद व बाशान येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने घेतला.


परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खास्दी, अरामी, मवाबी व अम्मोनी ह्यांच्या टोळ्या पाठवल्या.


ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले.


अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अगदी कत्तल करून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांच्यावर उठले; सेइरनिवाशांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले.


हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”


यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला;


गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत;


वैर्‍यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे.


माझे लोक इस्राएल ह्यांना मी दिलेल्या वतनास जे माझे दुष्ट शेजारी हात लावतात त्या सर्वांविरुद्ध परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी त्यांना त्यांच्या देशातून उपटून टाकीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून टाकीन.


अदोम, मवाब व अम्मोनी लोक ह्यांना,


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


आणि ती यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सीदोनाचा राजा ह्यांच्याकडे पाठव;


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!


अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?


हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;


अम्मोनी लोकांच्या सीमेवर येशील तेव्हा त्यांना उपद्रव देऊ नकोस व त्यांच्याशी झगडा करू नकोस, अम्मोनी लोकांच्या देशाचा कोणताही भाग मी तुला वतन म्हणून देणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना तो मी वतन म्हणून दिला आहे.’


अम्मोनी आणि मवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये;


कारण तुम्ही मिसर देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत, एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम-नहराईम1 येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan