Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 पळून जाणारे हेशबोनाच्या छायेत निर्बल होऊन राहत आहेत; कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघून मवाबाच्या सीमा व दंगेखोरांची माथी खाऊन टाकत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 जे पळून गेले होते ते हेशबोनाच्या छायेखाली निर्बल असे उभे राहिले, कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघाली आहे. ती मवाबाचे कपाळ आणि गर्विष्ठ लोकांचे डोके खाऊन टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 “हेशबोनच्या सावलीत फरारी हतबलपणे उभे आहेत, हेशबोनमधून अग्नी येत आहे, सीहोनच्या मध्यातून ज्वाला पसरत आहेत; त्या मोआबाचे कपाळ जाळून टाकीत आहे, त्या कर्कश बढाईखोरांचे मस्तक जाळीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:45
12 Iomraidhean Croise  

अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;


अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकले; त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत.


नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.


मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.


त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल;


त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो.


मग इस्राएलाने अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,


हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे नगर होते; त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्णोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता.


कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे. सीहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे; तिने मवाबाचे आर, आणि आर्णोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.


हे मवाबा! तू हायहाय करशील; कमोशाचे लोकहो तुम्ही नष्ट झालात, त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले, आणि आपल्या कन्या अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत.


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


येशू त्यांना म्हणाला, ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक आहे’, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan