Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मवाबाच्या सर्व धाब्यांवर, त्याच्या सर्व चव्हाट्यांवर चोहोकडे शोक चालू आहे; कारण नापसंत पात्राप्रमाणे मी मवाबाचा फोडून चुरा केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मवाबामध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि चौकात, तेथे सर्वत्र शोक होत आहे. कारण नकोसा असलेल्या पात्राप्रमाणे मी मवाबाचा नाश केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर आणि प्रत्येक चौरस्त्यावर केवळ आकांतच आढळत आहे, कारण जुन्या निकामी पात्रांचा चक्काचूर करावा त्याप्रमाणे मोआब भूमीचा मी चुराडा केला आहे,” याहवेह असे जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:38
13 Iomraidhean Croise  

लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”


आपल्या पेठांत ते गोणपाट नेसून आहेत; आपल्या धाब्यांवर व चौकांत ते सगळे आकांत करत आहेत, अश्रू ढाळत आहेत.


दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी : तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले?


कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.”


मग जी माणसे तुझ्याबरोबर असतील त्यांच्या डोळ्यांदेखत ते मातीचे मडके फोड;


आणि त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करता येत नाही, तसे मी ह्या लोकांचा व ह्या नगराचा भंग करीन व पुरण्यास जागा उरणार नाही इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील.


हा कोन्या तुच्छ, फुटक्या पात्रासारखा माणूस आहे काय? तो नापसंत पात्र आहे काय? त्याला व त्याच्या संतानाला माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकून दिले आहे?


मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.


इस्राएलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत.


जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा.


‘आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील;’


Lean sinn:

Sanasan


Sanasan