Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 प्रत्येक डोके भादरले आहे; प्रत्येक दाढी मुंडली आहे; सर्वांच्या हातांवर घाव आहेत, कंबरांना गोणपाट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुंडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 तेथील प्रत्येक डोक्याचे मुंडण झाले आहे व प्रत्येक दाढीचे बोडण झाले आहे; प्रत्येक हातावर घाव करण्यात आला आहे व प्रत्येक कमरेवर गोणपाट नेसलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:37
22 Iomraidhean Croise  

रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.


तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.


ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुर्‍यांनी व भाल्यांनी आपल्याला घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले.


एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.


त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तेव्हा त्याने आतून आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळले आहे असे त्यांना दिसले.


तेव्हा हानूनाने दाविदाच्या चाकरांना पकडून त्यांचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना घालवून दिले.


त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला.


आणि मधुर सुवासाच्या जागी कुजल्याची घाण, कंबरपट्ट्यांच्या जागी दोरी, वेणीफणी केलेल्या केसांच्या जागी टक्कल, झग्याच्या जागी गोणपाटाचे वेष्टण व सौंदर्याच्या जागी वण असे होईल.


हे ऐकून हिज्कीया राजा आपली वस्त्रे फाडून व गोणपाट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला.


ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.


शखेम, शिलो व शोमरोन येथून ऐंशी माणसे आली; त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले, व परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली.


गज्जाचे वपन झाले आहे; त्यांच्या खोर्‍यांतले उरलेले अष्कलोन नष्ट झाले आहे; तू कोठवर आपणास जखमा करून घेशील?


हे हेशबोना, हायहाय कर! कारण आय उजाड केलेले आहे; राब्बाच्या कन्यांनो, रडा! आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळा, शोक करा, आवारातून इकडून तिकडे धावा; कारण मिलकोम दैवत, त्याचे याजक व सरदार ह्यांच्यासह, बंदिवान होऊन जाईल.


ते तुझ्यामुळे डोकी भादरून टाकून, कंबरेस गोणपाट गुंडाळत आहेत व मनात अति खिन्न होऊन तुझ्यासाठी मोठ्याने विलाप करीत आहेत.


“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने सोरेस वेढा घातला तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करायला लावले; सर्वांच्या डोक्यांना टक्कले पडली, खांद्यांची सालटी निघाली, तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किंवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही.


ते कंबरेला गोणपाट गुंडाळतील, दरारा त्यांना व्यापील; त्या सर्वांच्या मुखावर लज्जा असेल व सर्वांची डोकी भादरण्यात येतील.


कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे.


तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”


तू आपले डोके भादर, तुझ्या लाडक्या मुलांमुळे केसांचे वपन कर, गिधाडाप्रमाणे आपल्या डोक्याचे टक्कल वाढव; कारण ती बंदिवान होऊन तुझ्यापासून गेली आहेत.


तो नेहमी, रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे.


माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan