Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 ह्यामुळे मवाबासाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे, कीर-हरेसच्या लोकांसाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे; त्याने संपादिलेले विपुल धन लयास गेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 म्हणून माझे हृदय मवाबासाठी बासरीसारखे विलाप करीत आहे, माझे हृदय कीर हरेसाच्या लोकांसाठी बासरीसारखे विलाप करीत आहे. त्यांनी मिळवलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 “माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे; कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे. त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:36
14 Iomraidhean Croise  

त्यांनी नगरांचा विध्वंस केला; सर्व चांगल्या शेतांत प्रत्येक पुरुषाने दगड फेकले, त्यांनी ती दगडांनी भरून टाकली; पाण्याचे सर्व कूप बुजवले, सर्व चांगली झाडे तोडून टाकली; फक्‍त कीर-हरेसेथ येथे त्यांनी दगडांशिवाय काहीएक राहू दिले नाही; आणि गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला.


क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते.


चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन नीतिमानासाठी साठवलेले असते.


धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.


माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत.


ह्यास्तव त्यांनी वाचवलेले व साठवलेले धन ते वाळुंजाच्या ओहळापलीकडे नेत आहेत.


ह्यामुळे माझी आतडी मवाबासाठी, माझे काळीज कीर-हरेसासाठी वीणेप्रमाणे नाद करीत आहे.


तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे.


तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्‍याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल.


माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.


ह्यामुळे मी मवाबाविषयी हायहाय करीन; अवघ्या मवाबासाठी आक्रंदन करीन; कीर-हरेसच्या लोकांसाठी शोक करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan