यिर्मया 48:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 हे सिब्मेच्या द्राक्षलते, तुझ्यासाठी याजेरच्या आक्रोशाहून अधिक आक्रोश करीन; तुझ्या फांद्या समुद्रा-पलीकडे गेल्या होत्या, याजेर सरोवरापर्यंत त्या पोहचल्या होत्या; तुझ्या ग्रीष्मऋतूतील फळांवर व द्राक्षांच्या हंगामावर लुटारू पडला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 हे सिब्मेच्या द्राक्षवेली, मी याजेरासाठी रडलो त्यापेक्षा तुझ्यासाठी मी अधिक रडेन. तुझ्या फांद्या क्षारसमुद्रापलीकडे गेल्या होत्या आणि त्या याजेरापर्यंत पोहोचल्या होत्या; पण विनाशकाने तुझ्या उन्हाळी फळांवर व तुझ्या द्राक्षांवर हल्ला केला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जसे याजेर शोक करतो, तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो. तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत, त्या याजेरपर्यंत पोहोचतात; संहार करणाऱ्याने तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे. Faic an caibideil |