Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 होरोनाईमाकडून ‘जुलूम! प्रचंड नाश!’ अशी आरोळी ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पाहा, होरोनाईमातून जुलूम व मोठा नाश होत आहे, असा किंकाळीचा आवाज येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर होरोनाईममधून विलापध्वनी ऐकू येत आहे, प्रचंड संहाराचा व विध्वंसाचा आक्रांत ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:3
12 Iomraidhean Croise  

बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.


माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत.


कारण मवाबाच्या प्रदेशात चोहोकडे आरडाओरड झाली आहे; त्यांचे आक्रंदन एग्लाइमापर्यंत, त्यांचा आक्रोश बैर-एलीमापर्यंत ऐकू जात आहे.


ह्यासाठी मी म्हणालो, “माझ्यावरून आपली दृष्टी फिरवा; मी मनस्वी रडणार आहे; माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे; त्याबद्दल माझे सांत्वन करण्याचे श्रम घेऊ नका.”


ज्या नगरांचा विध्वंस करून परमेश्वर अनुताप पावला नाही त्यांच्यासारखा तो मनुष्य होवो; सकाळी आरोळी, दुपारी रणशब्द त्याच्या कानी पडो.


“परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.


हेशबोनाहून एलालेपर्यंत, याहसापर्यंत आरोळी होते, सोअरापासून होरानाईमापर्यंत, एग्लाथ-शलिशीयापर्यंत आरोळी होते; कारण निम्रीमाचे पाणी आटले आहे.


मवाबाचा नाश झाला आहे; त्याच्या हीनदीन झालेल्या लोकांची आरोळी ऐकू येत आहे.


ते रडत रडत लूहीथाचा चढाव चढत आहेत; होरोनाईमाच्या उतारावर नाश! नाश! अशी संकटाची आरोळी ऐकू येत आहे.


बाबेलात आरोळीचा ध्वनी येत आहे! खास्द्यांच्या देशातून विध्वंसाचा गोंगाट होत आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan