Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 आम्ही मवाबाचा गर्व ऐकून आहोत, तो अति गर्विष्ठ आहे, त्याचा ताठा, त्याचा अहंकार, त्याचा अभिमान, त्याची उन्मत्तता आम्ही ऐकून आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 “आम्ही मवाबाचा गर्व ऐकला आहे. त्याचा उद्धटपणा, त्याचा गर्विष्ठपणा, अहंकार, अभिमान आणि त्याच्या हृदयातली उन्मत्तता ही आम्ही ऐकली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— तिचा गर्व किती मोठा आहे— तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:29
13 Iomraidhean Croise  

परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.


नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.


गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.


ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे.


परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.


मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.


मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan