Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मवाबाचा आदर राहिला नाही. हेशबोनात त्यांच्या शत्रूने तिच्याविरूद्ध अनिष्ट योजिले आहे. ते म्हणाले, ‘या व आपण तिचा राष्ट्राप्रमाणे नाश करू.’ मदमेनासुद्धा नाश होईल, तलवार तुझ्या पाठीस लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही; हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील: ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’ तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील; तलवार तुमचा पाठलाग करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:2
20 Iomraidhean Croise  

मवाबाविषयीची देववाणी : एका रात्रीत मवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले; एका रात्रीत मवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले.


माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत.


आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”


परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.


परमेश्वर, इस्राएलाचा देव, मला म्हणाला की, “माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवतो त्यांना तो पाज;


तेव्हा परमेश्वराच्या हातून मी तो प्याला घेतला व ज्या राष्ट्रांकडे परमेश्वराने मला पाठवले त्या सर्वांना तो पाजला;


“यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.”


“हे लोक म्हणतात की, ‘परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय?’ ह्या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत.


परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; कारण मी तुझ्याबरोबर आहे; ज्या राष्ट्रांत मी तुला हाकून दिले आहे, त्या सर्वांचा मी सर्वस्वी नाश करीन, पण तुझा सर्वस्वी नाश करणार नाही; तरी मी तुझे योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”


त्याच्या आसपास असणारे व त्याचे नाव जाणणारे तुम्ही सर्व त्याच्यासाठी शोक करा; म्हणा, ‘मजबूत वेत्र, वैभवी दंड कसा मोडला आहे!’


मवाब नाश पावून राष्ट्ररूप राहणार नाही, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई केली आहे.


पळून जाणारे हेशबोनाच्या छायेत निर्बल होऊन राहत आहेत; कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघून मवाबाच्या सीमा व दंगेखोरांची माथी खाऊन टाकत आहे.


हे हेशबोना, हायहाय कर! कारण आय उजाड केलेले आहे; राब्बाच्या कन्यांनो, रडा! आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळा, शोक करा, आवारातून इकडून तिकडे धावा; कारण मिलकोम दैवत, त्याचे याजक व सरदार ह्यांच्यासह, बंदिवान होऊन जाईल.


एलामाचा घात करू पाहणार्‍या त्याच्या शत्रूंपुढे मी त्यांना घाबरे करीन; मी त्यांच्यावर अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन, असे परमेश्वर म्हणतो; मी त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.


रऊबेनाच्या वंशजांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम,


Lean sinn:

Sanasan


Sanasan