Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ‘आम्ही वीर आहोत, युद्धाच्या कामी शूर आहोत,’ असे तुम्ही का म्हणता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 “आम्ही सैनिक, बलवान लढणारी माणसे आहोत असे तुम्ही कसे म्हणू शकता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:14
12 Iomraidhean Croise  

मी परमेश्वराचा आश्रय केला आहे; तर मग तुम्ही माझ्या जिवाला असे का म्हणता की, “तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा?


कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही.


मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.


कारण तो म्हणतो, “माझ्याच बाहुबलाने व माझ्या स्वत:च्या अकलेने हे मी केले आहे; मी चतुर आहे; मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत व त्यांची भांडारे लुटली आहेत; बलाढ्य वीराप्रमाणे मी तक्तांवर बसलेल्यांना ओढून काढले आहे;


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.


मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.


जी तू कड्याच्या कपारीत राहतेस, टेकडीच्या माथ्याचा आश्रय करून बसतेस, त्या तुला तुझ्या विक्राळपणाने, तुझ्या मनाच्या गर्वाने फसवले आहे; तू आपले कोटे गरुडाप्रमाणे उंच ठिकाणी केले असले तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वर म्हणतो.


‘आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे नियमशास्त्र आमच्याजवळ आहे,’ असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पाहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे.


परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये;


प्रभू परमेश्वर म्हणतो, मिसर देशाला आधार देणारे लोक पडतील, त्यांच्या पराक्रमाचा तोरा उतरेल; मिग्दोलापासून सवेनेपर्यंत ते तलवारीने पडतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकांना तुच्छ मानले व त्यांच्यावर तोरा मिरवला म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांना हे प्रतिफळ मिळेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan