Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मवाबाविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलांचा देव, असे म्हणतोः “नबोला हायहाय, कारण ते उध्वस्त झाले आहे. किर्या-थाईम काबीज केले गेले आहे आणि त्याची मानहानी झाली आहे. तिचे किल्ले पाडण्यात आणि अप्रतिष्ठीत केले गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मोआबी लोकांविषयी: इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, यांनी दिलेला संदेश हा आहे: “नबो शहराचा धिक्कार असो, कारण त्याचा विध्वंस होईल. किर्याथाईम लज्जित होईल व हस्तगत करण्यात येईल; तेथील किल्ले लज्जित होतील व चक्काचूर करण्यात येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:1
19 Iomraidhean Croise  

चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना


थोरल्या मुलीला मुलगा झाला, त्याचे नाव तिने मवाब असे ठेवले; आजमितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.


पाहा, हे अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक; इस्राएल लोक मिसर देशाहून येत असताना त्यांना तू ह्यांच्यावर स्वारी करू दिली नाहीस; ते ह्यांच्याजवळून वळून निघून गेले, व ह्यांचा त्यांनी नाश केला नाही.


परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.


तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील.


त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर; मी त्याला घडोघडी पाणी घालतो; त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करतो.


अदोम, मवाब व अम्मोनी लोक ह्यांना,


आणि ती यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सीदोनाचा राजा ह्यांच्याकडे पाठव;


मिसर, यहूदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी ह्या सर्वांना मी शासन करीन; कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.”


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


“अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन


अलमोन-दिबलाथाइमाहून कूच करून त्यांनी नबोसमोरील अबारीम डोंगरात तळ दिला.


किर्याथाईम, सिब्मा खोर्‍यातील पहाडावरील सरेथ शहर,


Lean sinn:

Sanasan


Sanasan