Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 47:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वराने तिला आज्ञा केली आहे; तर ती कशी स्वस्थ राहील? अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यांवर तिला त्याने नेमले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे. त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 47:7
15 Iomraidhean Croise  

मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


मी आपल्या पवित्र केलेल्या जनांना आज्ञा केली आहे, माझ्या क्रोधास्तव माझ्या वीरांना, अभिमानाने उल्लास पावणार्‍या माझ्या लोकाना मी बोलावले आहे.


तू ऐकलेस ना? मी हे फार पूर्वीच केले, अगदी प्राचीन काळी योजले असून आता असे घडवून आणले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी;


जो परमेश्वराच्या कार्याची हयगय करतो तो शापित होवो; जो रक्तपातापासून आपली तलवार राखतो तो शापित होवो.


मी देशावर तलवार आणून म्हटले की, अगे तलवारी, देशावर फीर आणि तिने मनुष्य व पशू ह्यांचा संहार केला;


“मानवपुत्रा, तू संदेश देऊन टाळी वाजव म्हणजे तलवारीस, भोसकणार्‍या तलवारीस, तिप्पट जोर येईल; त्यांना घेरणारी तलवार थोरांनाही भोसकणारी होईल.


ती पुन्हा म्यानात घाल. जेथे तू निर्माण झालास त्या तुझ्या जन्मभूमीवर मी तुझा न्याय करीन.


“मानवपुत्रा, संदेश देऊन सांग; परमेश्वर असे म्हणतो, तलवार, पाणी दिलेली, पाजवलेली तलवार!


म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात पलिष्ट्यांवर उगारीन, करेथ्यांचा संहार करीन आणि समुद्रकिनार्‍यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्‍याचे ऐका.


तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan