Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 47:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 फारोने गज्जावर मारा केला त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 47:1
11 Iomraidhean Croise  

कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.


महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे.


“हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे म्हणून आनंद करू नकोस, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्या साप होईल.


सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,


प्रभू परमेश्वर म्हणतो, पलिष्ट्यांनी सूड घेण्याची कृती केली आहे, मनात आकस धरून नाश करण्याच्या बुद्धीने त्यांनी निरंतरच्या वैरभावाने सूड घेतला आहे;


म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात पलिष्ट्यांवर उगारीन, करेथ्यांचा संहार करीन आणि समुद्रकिनार्‍यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन.


सोर, सीदोन व पलेशेथाचे सर्व प्रदेशहो, तुम्ही माझे काय करणार? मी केलेल्याचा बदला घेता काय? अथवा मला काही करता काय? मी त्वरेने तुमचे कृत्य तुमच्या माथी मारीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan