Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी हे काय पाहात आहे? ते भयभीत झालेले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. मागे वळूनदेखील न पाहता ते घाईघाईत पळत आहेत, आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:5
19 Iomraidhean Croise  

त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, “आपला जीव घेऊन पळ; मागे पाहू नकोस व खोर्‍यात कोठे थांबू नकोस; डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.”


ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


जे कोरीव मूर्तींवर भाव ठेवतात, ओतीव मूर्तींना “तुम्ही आमचे देव आहात” असे म्हणतात, ते उलथून पडतील व अगदी लज्जित होतील.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


तुझ्या बलिष्ठांचा का निःपात झाला आहे? त्यांना उभे राहवले नाही, कारण परमेश्वराने त्यांना ढकलून दिले आहे.


तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत; ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात; ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे.


ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.


प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, तुझ्या आसपास जे कोणी आहेत त्यांच्यातून मी तुझ्यावर दहशत आणतो; तुमच्यातील एकूणएकास हाकून लावतील, भटकणार्‍यांना एकत्र करायला कोणी राहणार नाही.


मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे.


अनेक राष्ट्रे तुला पाहून भयचकित होतील असे मी करीन; मी आपली तलवार त्यांच्या राजांसमोर परजीन, तेव्हा ते थरथर कापतील; तुझ्या पतनाच्या दिवशी आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.


तुम्ही वीरांचे मांस खाल, पृथ्वीचे अधिपती आणि मेंढे, कोकरे, बोकड व बैल ह्यांचे रक्त प्याल; हे सर्व बाशान डोंगरात पोसलेले आहेत.


निनवे पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती; तरी आता ते पळून जात आहेत; ते “थांबा हो थांबा,” असे ओरडतात, पण कोणी मागे वळून पाहत नाही.


चांदी लुटा! सोने लुटा! सर्व तर्‍हेच्या शोभिवंत वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे.


परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे; ऐका! परमेश्वराचा दिवस! तेथे वीर दुःखाने ओरडत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan