Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 रथांना घोडे जुंपा; घोड्यांवर स्वार व्हा; शिरस्त्राण घालून उभे राहा; भाले घासून साफ करा; चिलखत घाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 घोड्यांवर खोगीर चढवा, आणि अश्वारूढ व्हा! शिरस्त्राण घालून मोर्चा बांधा! भाल्यांना धार लावा, व चिलखते चढवा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:4
11 Iomraidhean Croise  

ह्या सर्व सेनेसाठी उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्ये व गोफणगुंडे तयार केले.


त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करत आणि यहूदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत.


अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल.


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


बाण पाजवा! ढाली धारण करा! परमेश्वराने मेद्यांच्या राजांना स्फूर्ती दिली आहे, नाश करावा अशी त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.


धनुर्धार्‍याने धनुष्य वाकवू नये, चिलखत घालून त्याने उभे राहू नये; त्याच्या तरुणांवर दया करू नका; त्याच्या सर्व सैन्याचा विध्वंस करा;


हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.


राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा; यज्ञयाग करून लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा; सर्व लढवय्यांना एकत्र होऊ द्या, आणि त्यांना चाल करू द्या.


शौलाने आपला पेहराव दाविदाला लेववला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले.


त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते; त्या कवचाचे वजन पाच हजार पितळी शेकेल होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan