Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 सर्प सरसर चालतो तसा तिचा आवाज होतो; ते सैन्यांसह येतात; लाकूडतोड्याप्रमाणे ते तिच्यावर कुर्‍हाडी घेऊन येतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जसे त्यांचे बलाढ्य शत्रूपुढे चाल करतील, जंगलतोड्यांगत येऊन त्यांच्यावर ते कुऱ्हाड घेऊन आक्रमण करतील. तेव्हा इजिप्त फुत्कारणाऱ्या सर्पाप्रमाणे पळ काढेल;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:22
13 Iomraidhean Croise  

दाट झाडीवर कुर्‍हाड उचलणार्‍या लोकांसारखे ते दिसले.


कुर्‍हाडीने तोडणार्‍यापुढे कुर्‍हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्‍यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्‍यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे.


सुरूची झाडे व लबानोनावरील गंधसरू तुझ्यामुळे हर्षित होऊन म्हणतात, ‘तू पडलास तेव्हापासून आमच्यावर कुर्‍हाड चालवणारा कोणी येत नाही.’


तुला खाली पाडतील तेव्हा तू भूमीतून बोलशील; धुळीतून तुझा शब्द हळूच निघेल; जमिनीतून भुतासारखा तुझा ध्वनी उठेल; धुळीतून कुजबुजल्यासारखी तुझी वाणी निघेल.


तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.


तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत; ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात; ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे.


परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत.


ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.


राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील, ती आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील.


हे देवदारू, हायहाय कर; कारण गंधसरू पडला आहे, वृक्षराज नष्ट झाले आहेत, बाशानाच्या ओक वृक्षांनो, हायहाय करा, कारण निबिड वन जमीनदोस्त झाले आहे.


सरदारांनी लोकांना सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूडतोडे व पाणके झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan