Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत; ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात; ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:21
25 Iomraidhean Croise  

दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.


कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य ह्यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला; तेव्हा ते आपसांत म्हणाले, “पाहा, इस्राएलाच्या राजाने हित्ती व मिसरी राजे द्रव्य देऊ करून बोलावले आहेत.”


प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते.


पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागवणे, ह्यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


रेडे, रानबैल व गोर्‍हे हे सर्व त्यांच्याबरोबर पडतील; त्यांच्या रक्ताने त्यांची भूमी भिजून जाईल; तेथली माती मांद्याने भरून जाईल.


पूर्वेकडील वार्‍याप्रमाणे मी त्यांना शत्रूपुढे विखरीन; त्यांच्या संकटसमयी मी त्यांच्याकडे पाठ करीन, तोंड करणार नाही.”


सर्प सरसर चालतो तसा तिचा आवाज होतो; ते सैन्यांसह येतात; लाकूडतोड्याप्रमाणे ते तिच्यावर कुर्‍हाडी घेऊन येतात.


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


अश्वांनो, दौड करा; रथांनो, भरधाव चाला; वीरहो, पुढे चाला; ढालाईत कूश व पूट, धनुर्धारी, धनुष्य वाकवणारे लूदी तुम्ही सर्व चालू लागा.


जो भीतीपासून निभावेल तो गर्तेत पडेल, जो गर्तेतून बाहेर येईल तो पाशात अडकेल; कारण मी त्याच्यावर म्हणजे मवाबावर समाचार घेण्याचे वर्ष आणत आहे, असे परमेश्वर म्हणतो.


ददानच्या रहिवाशांनो, पळा, फिरा, दडून राहा; त्याचा समाचार घेण्याची वेळ आली म्हणजे मी एसावावर नेमलेले अरिष्ट त्याच्यावर आणीन.


माझे वतन लुटणार्‍यांनो, तुम्ही जरी हर्ष व उल्लास करीत आहात, मळणी करणार्‍या कालवडीप्रमाणे बागडत आहात, मजबूत घोड्यांप्रमाणे खिंकाळत आहात,


त्याचे सर्व वीर मारून टाका; त्यांना वधस्थली जाऊ द्या; त्यांना धिक्कार असो! कारण त्यांचा दिवस, त्यांच्या समाचाराची वेळ आली आहे.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मिसरी राजा फारो ह्याच्याविरुद्ध आहे; त्याचा शाबूत व मोडका असे दोन्ही हात मी तोडून टाकीन, त्याच्या हातातून तलवार गळेल असे मी करीन.


तू कायमचे वैर धरलेस आणि इस्राएल लोकांवर संकट आले तेव्हा, त्यांचा पापमूलक अंतसमय आला तेव्हा, त्यांना तलवारीच्या धारेच्या हवाली केलेस;


समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.


तुम्ही हस्तिदंती पलंगावर निजता व मंचकावर ताणून पडता; कळपातली कोकरे व गोठ्यातली वासरे खाता.


माझ्या लोकांच्या विपत्काळी त्यांच्या वेशीत शिरू नकोस, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहून संतोष मानू नकोस, त्यांच्या विपत्काळी त्यांच्या मालमत्तेस हात लावू नकोस.


त्यांच्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे; त्यांच्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे; तुझ्या टेहळणी करणार्‍यांनी टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे; आता त्यांची त्रेधा उडेल.


पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, ‘आमंत्रितांना असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे; माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.’


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan